बेबी वॉकर
पालकांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, त्यांचे लहान मुल रोज नवीन काहीतरी शिकत आहे आणि रोज त्याच्यामध्ये काहीतरी प्रगती होत आहे हे पाहणे. लहान मुलांसाठी ही दुनिया खूप नवीन असते, नवीन गोष्टींकडे ते आकर्षित होत असतात, म्हणून लहान मुले खूप लवकर नवनवीन गोष्टी शिकत असतात आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे पार पाडत असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहून चालणे. स्वतःच्या पायावर उभे राहणं आणि चालणे ही तशी त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे. लहान बाळ जेव्हा चालवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात याचवेळी बेबी वॉकर घरात येतात. बेबी वॉकर हे आकर्षक व रंगबेरंगी असतात. परंतु बेबी वॉकर वापरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
बेबी वॉकरसाठी योग्य वय
बेबी वॉकर वापरण्यासाठी योग्य वय ठरलेले नाही, साधारणपणे 4 ते 16 महिने वय असलेल्या मुलांसाठी बेबी वॉकर वापरले जातात. वॉकर वापरण्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट तपासावी ती म्हणजे बाळाचे डोके स्थिर आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी. बाळाला स्वतःचे डोके स्थिर ठेवणे, डोक्याचा हालचालीवर नियंत्रण ठेवणे, तसेच बसणे यासाठी लागणारा कालावधी प्रत्येक बाळाचा वेग वेगळा असू शकतो.
बेबी वॉकर वापरण्याचे फायदे
बेबी वॉकरचे काही फायदे खाली दिले आहेत
1. मुलांचा मेंदूचा विकास जसा जसा होत जाईल तसे तसे ते एका ठिकाणी राहायला कंटाळतात. स्वतःच्या मनोरंजनासाठी ते नवीन वस्तू व नवीन ठिकाणे शोधात असतात. त्यांच्यातली जिज्ञासा त्यांना एका ठिकाणी बसू देत नाही. बेबी वॉकर मुळे त्यांना मनमोकळे पणाने फिरण्याचे स्वातंत्र मिळते.
2. लहान मूल चालायला शिकत असताना त्यांच्या पालकांना चिंता वाटत असते ती त्याच्या सुरक्षिततेची. बाळ चालणे शिकत असताना प्रत्येक वेळी पालकांचे त्याच्यावर लक्ष असेलच असे नाही, म्हणून बेबी वॉकर सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून बनवलेले असतात. त्यामुळे बाळाला कसलीही इजा होण्याचा धोका खूप कमी असतो.
3. बाळ वॉकर मध्ये सुरक्षित असल्यामुळे पालक स्वतःची दैनंदिन कामे लक्ष देऊन, निश्चितपणे करू शकतात.
4. वॉकर नसेल तर बाळांना आजूबाजूला फिरण्यासाठी पालकांवर अवलंबून राहावे लागते. पालक जिथे घेऊन जातील तिथेच खेळात बसावं लागत. वॉकर च्या मदतीने मुलांना मुक्त संचार करता येतो. त्यामुळे मुले आनंदी राहतात, म्हणून बेबी वॉकर मुले मुलाचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
5. बेबी वॉकरला विविध रंगबेरंगी खेळणी, संगीत, दिवे अश्या शिकण्याच्या वस्तू जोडलेल्या असतात. ते मुलांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यांचे मनोरंजन करतात.
6. वॉकर हलवण्यासाठी ते त्यांच्या हाताच्या आणि पायाच्या एकत्रित हालचाली करतात. त्यामुळे त्यांचा व्यायाम हि होतो आणि मोटार कौशल्य हि सुधारते. या व्यायामाचा फायदा त्यांचे स्नायू मजबूत होण्यासाठी होतो. चांगला व्यायाम झाल्यामुळे भूक हि वाढते आणि झोप हि चांगली लागते.
7. बेबी वॉकर मुले चालण्यासाठी पायाची हालचाल कशी करायची, तोल कसा सांभाळायचा याचा चांगला अंदाज त्यांना येतो त्यामुळे मुले चालायला शिकतात.
बेबी वॉकर वापरण्याचे तोटे
1. बेबी वॉकर मुळे चालण्याची क्षमता सुधारत नाही, तर उलट ती मंदावते. चालायला शिकताना मुलाला बाहेरून आधार मिळतो, ते स्वतः चालायला शिकण्यासारखे नसते.
2. वॉकर मध्ये चालत असलेली काही मुले वॉकर विना चे चालायचे टाळतात कारण त्यांना वॉकरच्या आधाराची सवय लागलेली असते. बेबी वॉकर शिवाय चालण्याचा कंटाळा करतात किंवा आधार नसेल तर चालायला घाबरतात.
3. बेबी वॉकर हे सुरक्षित असतात त्यामुळे ते पडत नाहीत, बाळाला कसला हि त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना कशाची भीती राहत नाही. जेव्हा मुले बिना वॉकर चे चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र ते खूप पडतात, धडकतात आणि स्वतःला इजा करून घेतात.
4. बेबी वॉकर वरती बाळाचा पूर्ण ताबा नसतो त्यामुळे ते असुरक्षित असतात. एकाद्या गोष्टीवर ते जोरात धडकून पडू शकतात.
5. बेबी वॉकर च्या साहाय्याने, लहान मुले हानिकारक वस्तूंपर्यंत सहजपणे पोहोचतात. जसे कि तीक्ष्ण वस्तू, विषारी रसायने, जनावरे.
वॉकर बाळाच्या नितंबांसाठी वाईट आहेत का?
बरेच पालक मुलांना वॉकर मध्ये बसवण्याची घाई करतात. त्यांचे पायाचे स्नायू त्या काळात पूर्ण विकसित किंवा मजबूत नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचा भार त्यांच्या नितंब आणि गुढग्यावर पडतो. त्याचा त्यांना भविष्यकाळात त्रास होतो. म्हणून पालकांनी वॉकर घेणाची घाई करू नये. जेव्हा बाळाचे स्नायू चालण्यासाठी तयार होतील तेव्हा बाळ स्वतःहून चालण्याचा प्रयत्न चालू करेल.
बेबी वॉकरसाठी पर्याय
बेबी वॉकर साठी चांगला पर्याय म्हणजे पालकांनी बाळाला चालण्यासाठी प्रोसाहित करावं. त्याच्यासोबत असे खेळ खेळावेत कि ते बाळ हालचाल करण्यासाठी, सभोवताली फिरण्यासाठी प्रेरित होईल. त्यातूनच ते स्वतः चालायला शिकेल.

Comments
Post a Comment